Categories: आरोग्य गुन्हे सामाजिक

निझामुद्दीनमधील तब्लिगींचा मस्तवालपणाः डॉक्टरांवर थुंकून शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार

नवीदिल्लीकोरोनामुळे संपूर्ण मानवजात संकटात सापडली असताना धर्माच्या नावाखाली देशात काहीजण करत असलेला उद्दामपणा संताप आणणारा आहे. हा उद्दाम आणि मस्तवालपणा निझामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यासाठी एकत्र जमलेल्या तब्लिगींकडून सुरू आहे. मरकजमधून बाहेर काढल्यानंतर कोरोनाची चाचणी करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय पथकावरच थुंकण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा किळसवाणा प्रकार या मस्तवालांकडून सुरू असून कोरोना चाचणीसाठी ते विरोध करत असल्याचाही आरोप आहे. 

निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या काही तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाइन केलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत थुंकण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या १६७ जणांना तुघलकाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं आहे. तर ९७ जणांना रेल्वेच्या डिझेल शेड ट्रेनिंग स्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ७० जणांना आरपीएफच्या बरॅकमध्ये क्वारंटाईन केलं असल्याची माहिती उत्तर रेल्वे विभागीय मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान क्वारंटाईन केलेल्या तब्लिगींपैकी काही जण सकाळपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत आहेत. कर्मचाऱ्यांकडे ते अवाजवी खाद्यपदार्थांची मागणी करत आहेत. कर्मचारी-डॉक्टरांच्या अंगावर थुंकत शिवीगाळ करत आहेत. एका जागी न थांबता होस्टेलमध्ये फिरत आहेत, असंही दीपक कुमार यांनी सांगितलं.

‘तब्लिग जमात’मधल्या १९ सहभागींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३८९ जणांचे ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. ८ हजार ७०० तब्लिगी निझामुद्दीनमधील मरकजला गेल्याचे समोर आले आहे. या सर्वांना लगेच ताब्यात घ्या आणि तब्लिगींच्या सहप्रवाशांनाही शोधा, असे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. या मोहिमेत गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकही सहभागी झाले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गुप्तचर विभागाद्वारे माहिती काढून तब्लिगींची धरपकड केली जात आहे. 

दरम्यान, राज्यात परतलेल्या ३१ तब्लिगींचे ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये पुण्याच्या २० तर सोलापुरातील ११ जणांचा समावेश आहे. पुण्यातील १० तब्लिगींचे रिपोर्ट बाकी आहेत. सोलापुरातील तब्लिगींच्या संपर्कातील १४ जणही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. सोलापूरच्या १७ पैकी ११ सहभागी परतले असून उर्वरित ६ तब्लिगींपैकी २ ठाण्यात, तर २ पुण्यात आहेत. कोल्हापूरातून गेलेल्या तब्लिगींनाही वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Team Lokshahi News