Categories: महिला सामाजिक

मराठा मुलींचे चारित्र्यहनन करणाऱ्यांवर कारवाई करा – संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

कोल्हापूर | मराठा मुलींच्या चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट काही लोक सोशलमीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण मराठा समाजामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे. अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरव्दारे केली आहे. कोणत्याही समाजातील महिलेचा सन्मान करणं हे सर्वांचच कर्तव्य असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणटलं आहे.

ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे, चौकशीअंती गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु सध्या सोशलमिडीयाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड येथे घडलेल्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विराज जगताप खून प्रकरणावरून सोशल मिडीयात मराठा समाजातील महिला वर्गाला लक्ष्य करून त्यांच्याविषयी चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत.

या प्रकरणात मराठा समाज आणि बौध्द समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन चर्चेने हा प्रश्न मिटवायला हवा अशी मागणीही खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Sambhajiraje