Categories: Featured गुन्हे महिला सामाजिक

मराठा समाजातील महिलांबद्दल गरळ ओकणाऱ्यांवर कडक कारवाई करा; जिजाऊच्या लेकींची निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्याकडे मागणी

नांदेड | पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकरण सध्या सगळीकडे गाजत आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोपीना कुणीही पाठिशी घालत नाही. याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया चालु असताना काही समाजकंटक मात्र या घटनेच्या आधारे मराठा-दलित समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या प्रकरणाला जातीय रंग दिला जात आहे. त्याचबरोबर टिक टॉक सारख्या अॅपवर मराठा समाजातील महिलांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिका टिपणी केली जात आहे. समाजाचे ऐक्य धोक्यात आणणाऱ्या अशा समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजातील महिलांना व्नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे साहेब यांना दिले आहे.

निवेदनात म्हणटले आहे की, विशिष्ट वर्गातील समाजकंटकामुळे राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना राज्यातील सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यातून राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील अशा जातीय वाद पसरविणाऱ्या आणि समाजातील महिलांच्या बाबत आक्षेपार्ह टिपणी करणा-यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. याशिवाय सोशल मिडियावर याप्रकरणी मराठा समाजाची भुमिका मांडणा-या तरूणांवर  अॉट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. अशा प्रकारच्या धमक्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून देऊन कायद्याचा सरळ सरळ गैरवापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून मराठा समाजाची मोठी बदनामी केली जात आहे. 

या सर्व प्रकाराला आळा बसावा आणि राज्यातील सामाजिक व कायदेशीर व्यवर-था आबाधित राहावी, याकरिता अशा समाजकंटकांना कडक शासन करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आलीय. हे निवेदन सकल मराठा समाजातील सुचिता जोगदंड यांच्यासह निता देशमुख, रोहिणी टाकळीकर, ऋतुजा पवार, श्रेया भोसले या पाच मुलीनी मास्क व सुरक्षित अंतर ठेवत निवासी जिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे दिले आहे.  

Team Lokshahi News