Categories: प्रशासकीय शिक्षण/करिअर

तलाठी महाभरती – २०१९ पात्र उमेदवारांची यादी पहा एका क्लिकवर!

कोल्हापूर। जिल्हा महसूल आस्थापनेवरील रिक्त वर्ग – ३ तलाठी पदासाठी दिनांक ०२ जुलै ते २६ जुलै २०१९ या कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. महापरिक्षा पोर्टल (माहिती तंत्रज्ञान ) यांच्याकडून उमेदवारांना मिळालेल्या गुणांची माहिती आधारे अंतिम निवड यादी दिनांक २६फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिध्द करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे. अंतिम निवड यादीत समावेश असणा-या उमेदवारांनी बिंदू नामावलीस अनुसरुन गुणानुक्रमाने महसुल उपविभागाचे वाटप आदेश करण्यात येणार आहे. तरी दिनांक ११ मार्च २०२० सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मुळ कागदपत्रासह व्यक्तीश: उपस्थित रहावे. सदर दिवशी अनुपस्थितीत राहील्यास उपविभाग वाटपाबाबत त्यांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. यादी पाहण्यासाठी येथेच क्लिक करा…!

News-26.2.2020-A

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Employment news तलाठी भरती तलाठी महाभरती तलाठी महाभरती - २०१९ नोकरी नोकरी संदर्भ महापोर्टल रोजगार वार्ता