टाटा ग्रुपच्या व्हायरल मेसेज मधून किती जणांनी कार जिंकल्या पहा..

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टाटा ग्रुपबाबत एक संदेश व्हायरल करण्यात येत आहे. या मेसेज मध्ये टाटा समुहाच्या १५० वा वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विजयी झाल्यास कार बक्षीस देण्यात येणार आहे असा संदेश दिला आहे. या व्हायरल मेसेजसोबत वेगवेगळ्या अनेक लिंकही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना कार मिळाल्यात हे या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया..

त्याआधी आपण कोणत्या लिंक व्हायरल होत होत्या तेही पाहूया..
https://tata.v0s.com/?1633066715715,
https://6gz.org/?1633078829219,
https://6gz.org/?1633057135047,
https://6gz.org/?1633088218498,
https://6gz.org/?1633018674591,
https://85y.org/?1633094614898,

या व्हायरल मेजेसची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलला भेट दिली असता काय सत्य समोर आलयं पहा.. टाटा ग्रुपने आपल्या पोस्ट मध्ये म्हणटलयं #FakeNotSafe या जाहिरात उपक्रमासाठी टाटा समूह किंवा त्याच्या कंपन्या जबाबदार नाहीत. कृपया दुव्यावर क्लिक करू नका आणि/किंवा इतरांना पाठवू नका.

टाटा ग्रुपनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर कुठलीही लिंक फॉरवर्ड न करण्याचा आग्रह केला आहे. यात सांगितलं गेलं आहे की, टाटा ग्रुप सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अपप्रचारासाठी जबाबदार राहणार नाही.

एकूणच, व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता पडताळली असता हा संदेश खोटा असल्याचे आढळले असून कोणालाही कार किंवा इतर कोणतेही गिफ्ट टाटा ग्रुपकडून देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झालय. त्यामुळे असे संदेश व्हायरल करताना खबरदारी बाळगणे आणि खातरजमा न करता फॉरवर्ड पर्यायावर तात्काळ जाणे टाळणे गरजेचे आहे.