पुणे | देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध IT कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, यावर्षी 40,000 कर्मचार्‍यांची भरती करण्याची योजना आखत आहे. दुसरीकडे, आयटी कंपनी इन्फोसिस 50,000 हून अधिक कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. (IT Company TCS and Infosys Recruitment 2022)

मार्च 2022 मध्ये इन्फोसिसमध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण 25.5 टक्क्यांवरून 27.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या संदर्भात इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी म्हटले आहे की, नोकरी सोडण्याची टक्केवारी आणि एकूण हेडकाऊंट या दोन्हींमध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे. (IT Jobs)

CNN-News18 नुसार, Infosys आणि TCS या मोठ्या IT कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 61,000 लोकांना कॅम्पस हायरिंग केले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, TCS आणि Infosys ने अनुक्रमे 1,00,000 आणि 85,000 फ्रेशर्सची नियुक्ती केली. (TCS & Infosys Hiring Programm)

Infosys आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50,000 हून अधिक फ्रेशर्स (आयटी जॉब्स फॉर फ्रेशर्स) नियुक्त करण्याची योजना करत आहे. त्याच वेळी, TCS 40 हजारांहून अधिक लोकांची भरती करण्याची योजना आखत आहे. निलांजन रॉय यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात आम्ही संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर 85,000 फ्रेशर्सना नियुक्त केले. या वर्षी आम्ही किमान 50,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा विचार करत आहोत.

दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे म्हणणे आहे की त्यांच्या नियुक्तीचा वेग मागील आर्थिक वर्षात सारखाच राहील. TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.जी सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की कंपनीने यावर्षी 40,000 लोकांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसरीकडे गरज भासल्यास आणखी लोकांचीही भरती केली जाईल.

Work From Home बद्दल TCS आणि Infosys ची भूमिका

Tata Consultancy Services द्वारे 25X25 मॉडेलचा अवलंब केला जात आहे आणि हॉट डेस्क सादर करण्यात आला आहे. 25X25 मॉडेलचे उद्दिष्ट लोकांना कार्यालयात परत आणणे आणि हळूहळू हायब्रिड वर्क मॉडेलमध्ये रूपांतरित करणे हे आहे. या मॉडेल अंतर्गत, 2025 पर्यंत, कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच घरून काम सुरू राहील. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हायब्रीड पद्धतीने कार्यालयात जावे लागल्यास त्यांना केवळ 25 टक्के वेळ कार्यालयात घालवावा लागेल.

दुसरीकडे, एचसीएलने सांगितले की ते हायब्रिड मोडमध्ये काम करणे सुरू ठेवेल कारण कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्याच वेळी, आयटी कंपनी इन्फोसिसने म्हटले आहे की, बॅक ऑफिसेस नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केले जातील. तथापि, येथे देखील काम हायब्रीड पद्धतीने केले जाईल.