Categories: कृषी

शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ; अशी करा नोंदणी..!

मुंबई | मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील सगळे वर्क फ्रॉम होम करत असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.

शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकरी बंधूना आता या पोर्टलवरील लिंकवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin

शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

Team Lokshahi News