Categories: Featured राजकीय

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, पहा कुणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद?

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव अंशू सिन्हा यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.   गेले अनेक दिवस खातेवाटप रखडल्याने पालकमंत्रीपदाचे वाटपही करण्यात आले नव्हते. दरम्यान खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज पालकमंत्री पदांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. 

 • 1.        पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
 • 2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
 • 3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
 • 4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
 • 5. रायगड – श्रीमती आदिती सुनिल तटकरे
 • 6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
 • 7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
 • 8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
 • 9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
 • 10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
 • 11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
 • 12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
 • 13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
 • 14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
 • 15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
 • 16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
 • 17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
 • 18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
 • 19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
 • 20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
 • 21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
 • 22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
 • 23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
 • 24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
 • 25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
 • 26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
 • 27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
 • 28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
 • 29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
 • 30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
 • 31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
 • 32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
 • 33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
 • 34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
 • 35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
 • 36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे         
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank insurance bank loan crop insurance farmer insurance farmer producer company guardian minister list ICICI insurance India news indian policy Indian politics Insurance Kotakinsurance loan for farmer Mumbai city policy terms rural news sbi bank loan Thackeray Government thackeray govt. guardian minister Uddhav Thackeray