Categories: Featured

दहा रुपयांत जेवण देणारी ‘शिव भोजन योजना’, CM उध्दव ठाकरेंची घोषणा

नागपूर।२१ डिसेंबर। महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्वाच्या घोषणा केल्यात. गोरगरीबांसाठी १० रूपयात थाळी या योजनेचीही ठाकरे यांनी यावेळी घोषणा केली.

शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार करण्यास बांधील आहे, असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील महिन्यापासून दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’ राज्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणे उघडण्यात येतील असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Team Lokshahi News