Categories: कृषी बातम्या राजकीय

दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; थेट खात्यात पैसे जमा होणार!

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळी आधी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. यासाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी ही मदत देण्याचा निर्णय सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

याबाबत वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होते. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन उध्दव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन सरकारच्या वतीने पूर्ण करण्यात येत आहे. सोमवारी 9 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात ही मदत दिली जाणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटींचा तर दुसरा हप्ता 5300 कोटींचा असणार आहे.

या प्रमाणात मिळेल मदत – 

  • शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
  • फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
  • मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: agriculture insurance cm Uddhav Thackeray crop insurance Farmer heavy rain fall vijay Vadettiwar