Categories: Featured कृषी

कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे शेतकरी संभ्रमात

मुंबई। महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख थकीत कर्जासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र या यादीत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावेच नसल्याचे समोर आले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असूनही कर्जमाफीच्या निकषात बसणारी रक्कम न दाखविता कमी रकमेची कर्जमाफी नोंदविली आहे. प्रशासनाच्या या सावळ्यागोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला असून शेतकरी चिंतेत आहेत. (Mahatma Jyotirao Phule farmer loan waiver scheme)

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना याद्या केव्हा प्रकाशित होणार याची उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वीच याद्या प्रकाशितही झाल्या. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी बँक पासबुक आणि आधार प्रमाणिकरणही पूर्ण केले. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर्जमाफीची कमी रक्कम याद्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कर्जमाफीच्या प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी रक्कम दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे कर्ज जास्त असूनही यादीत कमी रक्कम दर्शवण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना