मुंबई | गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MHA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार), कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार), प्रशासकीय अधिकारी , मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
1) कायदा अधिकारी श्रेणी – उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे.
2) प्रशासकीय अधिकारी – समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा.
3) मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US. पर्यवेक्षक/सल्लागार – MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे.
4) सर्वेक्षक – 12वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पगार
1) कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
2) कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35,000/- रुपये प्रतिमहिना
3) प्रशासकीय अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना
4) मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/- रुपये प्रतिमहिना
5) पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000/- रुपये प्रतिमहिना
6) सर्वेक्षक – 25,000/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.