पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Board Result date) हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra SSC Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
  • SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.
  • यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका.
  • विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल.
  • पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.

‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल 
1. mahresult.nic.in
2. maharashtraeducation.com
3. mahahsscboard.maharashtra.gov.in
4. sscresult.mkcl.org