Categories: कृषी

शेतकरी बंधूनो PM किसान योजनेचा सहावा हप्ता आला; नसतील आले पैसे तर ‘असे’ तपासा..!

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा तब्बल १० कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रूपये दिले जात असून दर चार महिन्यांनी २ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभांतरणाव्दारे वितरित केले जातात. सहावा हप्ता शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित केला जाणार आहे.

  • एकाच दिवशी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात नाहीत. या योजनेचे लाभार्थी कोट्यवधी शेतकरी आहेत, यामुळे पैसे हस्तांतरण करण्यास वेळ लागतो.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाल्याचे समजत नाही अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने टोल फ्री हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी अगदी घरबसल्या आपल्या हक्काचे पैसे जमा झालेत की नाही हे देखील तपासू शकतील अशी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. 

या माध्यमातून तपासू शकता तुमचा पीएम किसान योजनेचा तपशील

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोईसाठी https://pmkisan.gov.in/ हे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळवता येते.

  • शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्यासाठी योजनेच्या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नरवरील लाभार्थ्यांचा तपशील (Beneficiary Status) तपासा. याठिकाणी क्लिक केल्यावर आधार नंबर, बॅंक खाते नंबर आणि मोबाईल नंबर या तिन्हीपैकी कोणत्याही एका माध्यमातून आपल्या खात्याचा तपशिल तपासता येतो.
  • पीएम किसान योजनेचा लाभ देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा मानस आहे, परंतु अद्याप १२ कोटी शेतकऱ्यांची नोंद करण्यात सरकारला यश आले आहे. यातील ८ कोटी ५३ लाख शेतकरी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेत असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही, नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ या योजनेसाठी नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. यासाठी फार्मर कॉर्नरवरील नवीन नोंदणी (New Registration) पर्यायावर क्लिक केल्यास आधार कार्डच्या आधारे स्वतःच नोंदणी करता येते.
  • जर नोंदणी करून देखील पैसे येत नसतील तर काही तांत्रिक दोषांमुळे खात्यात पैसे येत नाहीत. यामध्ये आधार नंबर चुकीचा असणे, बॅंक खाते नंबर, आयएफएससी कोड चुकणे, नावातील स्पेलिंगच्या चुका असणे असे दोष असतात. यातील आधार मधील चुका असतील तर त्या आधार फेल्युअर (Edit Aadhar Failure Record) वर जाऊन दुरूस्त करता येतात. तर बॅंकसंबंधित दुरूस्त्यांसाठी कृषि विभाग, तहसील कार्यालय, बॅंक याठिकाणी जाऊन त्या दुरूस्त कराव्या लागतील.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना