Categories: राजकीय

“वेळ प्रत्येकाची येते…” मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबद्दलचा हा लेख थेट पोलंडमधून!

Er Vaibhav Shinde यांच्या वॉलवरून –

आदरणीय श्री.उध्दवसाहेब ठाकरे पूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आणि काही जवळचे स्नेही सोडले तर इतरांच्या संपर्कात कधीच आले नाहीत. त्यामुळं अनेकांना त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व ठाऊक नाही. म्हणून अनेक पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक त्यांना कमी लेखतात. ते यापूर्वी कधी मंत्रालय किंवा विधिमंडळात न आल्याने इतर पक्षातल्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे फारसे संबंध नव्हते त्यामुळं इतर राजकारणी देखील त्यांना कमी लेखायचे. राज ठाकरे त्या उलट आहेत. इतर पक्षातले मित्र देखील आहेत आणि अधून मधून विविध पत्रकार संपादक विश्लेषक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना पार्ट्या देऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत या सगळ्यांना मर्जीत ठेवतात. त्यामुळं राज वर लिहिलेल्या अनेकांचे लाडके आहेत. त्यामुळं राज यांच्या आक्रमक स्वभावासमोर मा.उध्दवसाहेब यांचा शांत मृदू स्वभाव ठेऊन राज कसे भारी आहेत हे बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न ही मंडळी करत असतात.

खांडेकर त्यातलाच आहे. मा.उध्दवसाहेब ठाकरे नी तर त्याला फाट्यावर मारलंय. मुख्य म्हणजे त्यांनी या सगळ्या चॅनल्सना मुलाखती देणं बंद केलंय आणि संजय राऊत जी मुलाखत घेतात तीच प्रसारित करायला लावली जाते, त्यामुळं बऱ्याच संपादकांची जळली आहे. मला वाटतं एबीपीला शेवटची मुलाखत त्यांनी माझा कट्टा वर दिली होती जेव्हा ते फोटोग्राफी प्रदर्शनातून शेतकरी मदत निधी जमवणार होते. एका चांगल्या कामाचा प्रसार व्हावा म्हणून ती मुलाखत दिली नंतर त्यांनी एबीपी कडे ढुंकूनही बघितले नाही. नेहमी सेने बद्दल मा.उद्धवजी तसेच मा.आदित्यजी बद्दल उलट सुलट खोट्या बातम्यांच्या कंड्या पिकवत राहतात तरी यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. मग शेवटचा उपाय म्हणून अधून-मधून नारायण राणे, नील्या-नित्या, संदीप देशपांडे, चंपा, फडण२० वगैरे लोकांचे गलिच्छ टीकात्मक बाईट्स किंवा मुलाखती प्रसारित करतात तरीही ठाकरे पिता पुत्रांचा संयम सुटत नाही. म्हणून यांची जास्त चरफड होत आहे.

मा.उध्दवसाहेब ठाकरेंना समजून घेण्याची यांची लायकी नाही, तेवढी बौध्दिक पात्रता समज यांना नाही. आज राणे राज ची अवस्था सगळ्यांना माहीत आहे. गणेश नाईक ही त्याच अवस्थेत आहे. आणि फडणवीस यांची तशी अवस्था व्हायला सुरुवात झालेली आहे. फडणवीस यांनी केवळ सत्तेच्या जीवावर स्वतःचा कृत्रिम प्रभाव व दहशत निर्माण केली होती गेली पाच वर्ष. सत्ता जाताच त्यांचा खरा प्रभाव काय आहे ते दिसत आहे सगळ्यांना. निवडणुकीच्या निकाला पर्यंत मा.उध्दवसाहेब व आदित्यजी यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका करणारे काँग्रेस-एनसीपी वाले कार्यकर्ते, काही तटस्थ सामाजिक कार्यकर्ते देखील १०० दिवसात फॅन झालेत त्यांचे, आणि त्यांचं कौतुक करताना थकत नाहीत इथेच ते जिंकलेत. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या वरिष्ठ मंत्र्यांनीही मान्य केलं की इतकी वर्ष त्यांच्याशी संपर्क नसल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वा विषयी गैरसमज होते कारण माध्यमांमधून जी इमेज बनवली जायची त्या आधारे त्यांच्या विषयी मत बनवलं जायचं पण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत काम करतानाचा अनुभव खूप चांगला आहे.

हे मंत्री उद्धवजी बद्दल अनभिज्ञ होते या वरून आणखी एक खात्री पटते की यांच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी कधीही स्वतःच्या खासगी कामासाठी या मंत्र्यांना संपर्क केला नसावा. अयोध्या दौऱ्यात काँग्रेसचे सुनील केदार व राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ कधी प्रकट झाले ते देखील कळलं नाही आणि त्यामुळं भाजपच्या टीकेतली हवाच निघून गेली. मुख्य म्हणजे माय नेम इज खान च्या वेळी आणि राहुल च्या मुंबई दौऱ्यावेळी शिवसैनिकांना सत्तेचा माज दाखवत त्यांच्यावर पोलिस कारवाई करणारे अशोक चव्हाण आज सीएम साहेब सीएम साहेब म्हणत मा.उद्धवसाहेबांच्या अवती भोवती दिसतात. आणि फडणवीसांना मित्र मित्र म्हणत रोज त्यांची मजा घेतली जाते.

Lokshahi News

Share
Published by
Lokshahi News
Tags: uddhav thackeray cm of maharashtra