Categories: Featured

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे..!

चहा हे तसे पाहिल्यास तमाम भारतीयांचे आवडते पेय आहे. जगाच्या तुलनेत चहा पिणाऱ्यांचे प्रमाण देखील भारतात जास्त आहे. परंतु बहुतांशी लोक जो चहा पितात तो साखरेचा असतो. परंतु हा चहा शरीरासाठी हानिकारक आहे. डॉक्टर देखील साखरेचा चहा पिण्यावर मर्यादा घाला असे वारंवार सांगतात. त्याऐवजी गुळाचा चहा शरीरासाठी उपयुक्त असून गुळाच्या चहाचे शरीरास विविध फायदे देखील होतात. 

पोषक घटकांचा विचार केल्यास गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असतात. लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, विटामिन – बी हे पोषक घटक अधिक असतात. जे आपल्या शरीरास अधिक उपयुक्त असतात. सहसा गुळाचा चहा बनवताना सेंद्रिय म्हणजेच काळा गूळ वापरा. कारण पांढऱ्या गुळामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते.

गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे – 

  • गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असल्यास तुम्ही गुळ घालून त्याचा चहा पिऊ शकता.
  • गुळाचा चहा पिल्याने पचनशक्ती सुधारते, आणि छातीत जळजळ होत नाही.
  • रोजच्या धावपळीमुळे आपल्याला जास्त थकवा जाणवतो. अशा वेळेस नियमित गुळाचा चहा पिल्यास तुमच्या शरीरामधील थकवा निघून जातो आणि तुम्हाला फ्रेश वाटते.
  • बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुळाचा चहा प्या.
  • सर्दी आणि खोकला यासाठी गुळाचा चहा अत्यंत उपयुक्त आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी गुळाचा चहा पिल्याने तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही.
  • डोके दुखत  असेल तर आपण गाईच्या दुधात गुळाचा चहा प्यावा. यामुळे आराम मिळतो.
  • चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स उठल्या असतील तर तुम्ही नियमित गुळाचा चहा घेऊ शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होईल आणि तुमचा रंग ही उजळेल.
Team Lokshahi News