सध्या दुग्ध उत्पादनासाठी बहुतांशी शेतकरी जर्सी गायींचे संगोपन करण्यावर भर देतात. जर्सी गाय दुध उत्पादन अधिक देते असे अनेक शेतकऱ्यांना वाटते. परंतु हा शेतकरी वर्गाचा गैरसमज असून भारतीय देशी वंशाचा गायी जर्सी गायीपेक्षा कितीतरी पटीने अधिक दुध उत्पादन देतात. आज आपण अशाच काही सर्वाधिक दुध उत्पादन देणाऱ्या देशी गोवंशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
पशूपालन हा शेतीला पूरक असा जोडव्यवसाय आहे. पशुपालनातून दुध उत्पादन आणि शेणखत मिळते. या दोन्हीमधून शेतकऱ्यांना आर्थिक कमाई होते. त्याचबरोबर शेतीसाठी खत, घरी खायला दुध आणि पशुपालन विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे फायदेशिर पशुपालनासाठी पशुपालक नेहमीच दुधाळ जनावरांना प्राधान्य देतात. आज आपण अशाच काही गायीच्या जातीविषयी माहिती घेणार आहोत, ज्या दुध व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहेत.
गायीच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या दररोज ५० लिटर पेक्षा जास्त दूध देतात. विशेष म्हणजे देशी गायीचे दूध हे पौष्टीक मानले जाते यामुळे पशुपालक नेहमी अशा गायींना पाळण्यास प्राधान्य देतात. परंतु मध्यंतरीच्या काही कालावधीत भारतीय पशुपालकांचे देशी गोवंश पालनाकडे दुर्लक्ष झाले आणि संकरित गायींच्या जातींनी देशभरात धुमाकुळ घातला. परंतु अशा गायींचे दुध देशी गायींच्या तुलनेत सर्वच बाबतीत निकृष्ट दर्जाचे असल्याने पुन्हा देशी गायीच्या दुधाची मागणी वाढू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशी गायीच्या दुधउत्पादनाला सध्या मोठा वाव असून चांगला नफा कमावयाचा असल्यास पुढील देशी गोवंशाच्या जातींबद्दल आपणास माहित असणे खूप गरजेचे आहे.
देशातील इतर गायींच्या तुलनेने या जातीच्या गायी अधिक दूध देतात. या गायीचे दूधाचे प्रमाण इतके असते की चार चार जणांना दूध काढण्यास बसावे लागते. गीर गाय दररोज साधारण ५० ते ८० लिटर दूध देते. या गायी गुजरातमधील गीरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच या जंगलावरून त्यांचे नाव ‘गीर’ पडले आहे. गीर गायींना देश आणि विदेशात दुध उत्पादनासाठी खूप मागणी आहे. ब्राझील आणि इज्रायलमध्ये या गायींवर अधिक संशोधन करण्यात आले असून उत्पादनक्षमता भारतापेक्षा वाढवण्यात आली आहे.
साहिवाल गाय यूपी, हरियाणा, मध्यप्रदेशातील शेतकरीवर्गाकडे मोठ्या प्रमाणात आढळतात. साहिवाल गाय २००० ते ३००० लिटर दूध देत असतात. या गायीची सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ही गाय वासराला जन्म दिल्यानंतर १० महिन्यापर्यंत दूध देते.
ही गाय मुळची राजस्थान मधील आहे. राजस्थानमधील गंगानगर, बीकानेर, आणि जैसलमेर या भागात या जातीच्या गायी आढळत असतात. तसेच गुजरातमध्येही या जातीच्या गायी पाळल्या जातात. याचं कारण म्हणजे या गायी दररोज साधारण ८ ते १५ लिटर दूध देतात. या गायींचे वजन साधारण २८० ते ३०० किलोग्रॅम असते.
या गायी सिंध प्रांतात आढळतात. यामुळे या गायींचे नाव सिंधी पडले आहे. दरम्यान या गायी आता पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आणि ओडिशामध्येही पाळल्या जात आहेत. सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींपैकी ही जात आहे. या जातीच्या गायी वर्षाला साधारण २ हजार ते ३ हजार लिटर इतके दूध देतात.