Categories: Featured

‘हे’ आहेत जिऱ्याचे खास फायदे; वाचून नक्कीच आर्श्चयचकित व्हाल..!

जिरे हा मसाल्यातील महत्त्वाचा पदार्थ असून भारतीय खाद्यपदार्थात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जिरे जेवणाचा स्वाद वाढवण्याबरोबरच त्याच्या औषधी गुणधर्मामुळे अधिक वापरले जाते. जिऱ्याचे काही महत्वाचे फायदे या लेखात आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, जे तुम्हाला नक्कीच आवडतील…

 • जिरे केवळ स्वयंपाकाची चव वाढवण्याचं काम करत नाही, तर निरोगी राहण्यासाठीसुध्दा गुणकारी आहे.
 • दररोज चिमुटभर जिरे सेवन केले तरी वजन झपाट्याने  कमी होण्यास मदत होते.
 • जिऱ्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
 • जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलॅटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे हे वरदान आहे.
 • जिऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यास जिरे लाभदायक ठरते.
 • जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ कमी करण्यास मदत करते.
 • मुळव्याधीसाठी देखील जिरे गुणकारी आहे.
 • डायबिटीस असणाऱ्या रूग्णांसाठी देखील जिरे वरदान असून ते रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
 • जिऱ्यात व्हिटॅमिन ‘ई’ अधिक असल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
 • जिरे सेवन केल्याने स्वाईन फ्लू आणि ताप कमी होण्यास मदत होते.
 • चेहऱ्यासाठी जिऱ्याचे हे आहेत खास फायदे
  • जिऱ्याचा वापर चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावरील मुरमं कमी करण्यासही जीरं गुणकारी ठरु शकत. जिऱ्यात बरेच एन्टीऑक्सिडेंट असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. जीरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि सकाळी उठल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होऊ शकतो. जिऱ्याच्या पाण्याने वाफही घेऊ शकता. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, इतर अशुद्ध घटकही बाहेर निघण्यास मदत होऊ शकते. यामुळे ब्लॅकहेड्स काढणंही सोपं होऊ शकतं. वाफ घेतल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळित होण्यास मदत होते. जिऱ्यापासून बनलेला फेसपॅकही फायदेशीर ठरु शकतो. फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरं हे मिश्रण करुन त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होऊ शकते.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Benefits of drinking cumin water benefits of eating coriander cumin benefits of eating cumin benefits of eating ova cumin coriander cumin water cumin farming cumin hot or cold cumin information use of cumin for weight loss ओवा जिरे खाण्याचे फायदे जिरे उष्ण की थंड जिरे खाण्याचे फायदे जिरे पाणी पिण्याचे फायदे जिरे माहिती जिरे लागवड जिरे शेती कशी करावी धने जिरे खाण्याचे फायदे धने जिरे पाणी वजन कमी करण्यासाठी जिरे चा उपयोग