Categories: Featured

‘या’ कर्मचाऱ्यांना लागू नाही पाच दिवसांचा आठवडा…

मुंबई। ठाकरे सरकारने केंद्राच्या धर्तीवर राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी यातून काही विभाग आणि सेवांना मात्र पाच दिवसाचा आठवडा लागू केलेला नाही. यामध्ये  ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांचा समावेश आहे.

ज्या कार्यालयाना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही त्यांची नावे पुढील प्रमाणे- 

  • अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार. 
  • शैक्षणिक संस्था : शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने.
  • जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा.  नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी.
  • सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर.
  • महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे.
  • सामान्य प्रशासन विभाग : शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग.
  • कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना.
  • उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : शासकीय मुद्रणालये.
  • कौशल्य व उद्योजकता विकास : सर्व आयटीआय.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Maharashtra government employee