sukanya smridhi yojana
नवी दिल्ली | देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकार विविध योजना राबवते. या उद्देशानेच पोस्ट कार्यालयामार्फत मुलींसाठी एक चांगली योजना आणली आहे. सुकन्या समुद्धी योजना असे या योजनेचे नाव असून टपाल कार्यालयातील ही लोकप्रिय झालेली योजना आहे.
सुकन्या समृध्दी योजनेतून मुलींचे शिक्षणापासून लग्नापर्यंत आर्थिक मदत मिळते. या योजनेत वार्षिक गुंतवणूकीवर चांगला परतावा ही मिळतो. सुकन्या योजनेच्या अंतर्गत टपाल कार्यालयात किंवा कमर्शियल बँकेत खाते उघडता येते. योजनेतील गुंतवणुकीवर ७.६ टक्के व्याज मिळते. या योजनेचे मॅच्युरिटी २१ वर्षाची असून गुंतवणूक फक्त १४ वर्षांसाठी करावी लागते.
सुकन्या समुद्धी योजनेमध्ये वर्षाला १.५० लाखापर्यंत रक्कम जमा करता येते. यासाठी महिन्याला १२ हजार ५०० रुपये द्यावे लागतील. योजनेत किमान २५० रुपये जमा करता येतात. योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षापेक्षा कमी असावे लागते. एका परिवारात दोन्ही मुलींच्या नावाने खाते उघडता येते. जर दोन पेक्षा जास्त मुली असतील तर खाते उघडण्यासाठी जन्म प्रमाणपत्रासह एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. या योजनेचा लाभ घेतल्यास आपल्याला आयकरामध्ये सुट मिळते. मुलीचे वय साधरण १८ वर्ष झाल्यानंतर शिक्षण किंवा लग्नासाठी जमा करण्यात आलेल्या रक्कमेतून ५० टक्के रक्कम आपण काढता येते.
सुकन्या समुद्धी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया –
योजनेत अर्ज करण्यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क करावा. याठिकाणी उपलब्ध भरावा. अर्जासोबत ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, आधार कार्ड, मुलीचे नाव, जन्म प्रमाण पत्र, फोटो इत्यादी कागदपत्र खाते उघडण्यासाठी लागतात. दरम्यान सुकन्या समुद्धी योजनेच्या अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपये १४ वर्षापर्यंत जमा करतात तर एकूण २१ लाख रुपयांपर्यतची रक्कम जमा होते. यावर ७.६ टक्के व्याजाने ३७ लाख ९८ हजार २२५ रुपये इतकी रक्कम जमा होते. यानंतर ७ वर्षापर्यंत या रक्कमेवर अजून व्याज मिळते. अशा प्रकारे २१ वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर ही रक्कम ६३ लाख ४२ हजार ५८९ च्या घरात पोहचते.