बुलडाणा | पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून राज्यातील बरेच शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागाला दिलेत. बुलडाणा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत अनेक जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. पण अजून बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. यावेळी दादाजी भूसे म्हणाले की, पोकरा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी नेमून योजनेच्या कामांचा अहवाल तयार करावा. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सात बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणचे काम प्रभावीपणे होऊ शकते.
शेतकरी बंधूनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी स्वतःच अशी करा नोंदणी
यासाठी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात New farmer Registraion हा पर्याय दिसेल, येथे शेतकरी स्वत नोंदणी करू शकतात. तसेच स्वतः नोंदणी केलेले शेतकरी Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी झालेली आहे की नाही हेही तपासू शकतील. याठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.
पीएम – किसान योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे
नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाची वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.