Categories: कृषी राजकीय

कृषि विधेयकावरून शरद पवारांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई | कृषिविधेयकावरून सदस्यांना बाजू न मांडू देणाऱ्या राज्यसभेच्या उपाध्यक्षावर माजी केंद्रीय मंत्री व खा. शरद पवार यांनी टिका केली आहे. माझ्या ५० वर्षाच्या संसदीय कार्यकालात राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलेल नाही अशा शब्दात पवार यांनी  हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषीविधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणीही केली. 

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही असे सांगितले. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. मुळात सत्ताधाऱ्यांनी तशी चर्चा घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली.

यावेळी पवार यांनी, राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर विरोध करणाऱ्या सदस्यांना निलंबितही करण्याचे कामही केल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या सदस्यांनी निलंबनाविरोधात अन्यत्याग केला असून मीही त्यांच्या अभियानात सहभागी होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Team Lokshahi News