Categories: Featured सामाजिक

राज्यातील सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठीची ‘ती’ अधिसूचना खोटी..!

मुंबई। सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या अधिसूचनेमुळे राज्यातील सलून आणि ब्युटीपार्लर्स २९ मे पासून सुरू होणार असल्याचा दावा केला जात होता. परंतु याबाबत डीजीआयपीआरनं खुलासा केला असून अशा प्रकारची कोणतीही अधिसूचना राज्यसरकारच्या वतीने काढली नसल्याचे स्पष्ट केलयं. 

राज्यातील सलून आणि ब्युटीपार्लर सुरू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्याची एक अधिसूचना सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. डीजीआयपीआरच्या खुलाशानंतर ही अधिसूचना समाजकंटकांकडून व्हायरल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या अधिसूचनेत सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिकांसाठी नवीन नियमावली सोशलडिस्टंसिंग याबाबतीत देखील उल्लेख करण्यात आला होता. परंतु हे सर्व तथ्यहीन असल्याचे डीजीआयपीआरंने म्हणटले आहे.

ही बनावट अधिसूचना अजोय मेहता यांच्या चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र सरकार यांच्या नावे प्रसिध्द करण्यात आली होती. सध्या राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांना लॉकडाऊनच्या नियमांचा मोठा फटका बसला असून नागरिकांची देखील मोठी गैरसोय सुरू आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: beauty parlour beauty salon beauty shop hair salon