Categories: Featured आरोग्य सामाजिक

‘या’ योजनेअंतर्गत 50 कोटी लोकांची कोरोना चाचणी आणि उपचार मोफतः सरकारचा निर्णय

नवी दिल्ली। देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणण्याचे ठरवले आहे. यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. या संबंधीचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

Rajendra Hankare