‘शेट्टी साहेब’ ही वेळ बलिदानाची नाही तर आत्मचिंतनाची…

संपादकीयराजेंद्र हंकारे :
एखादा जटीलातील जटील प्रश्नही समन्वयातून सुटतो. परंतु समन्वयच नसेल तर छोट्याशा विसंवादाने अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या राज्यात राजू शेट्टींच्या आमदारकीवरून सुरू झालेला गोंधळ आणि या प्रश्नावरून पुढे आलेले मुद्दे पाहता जुन्या जखमेवरची फक्त खपलीच निघालीय असे दिसतं आहे.

राजू शेट्टी संघटनेतील सहकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत ही त्यांच्याविषयीची जुनी तक्रार पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आलीय. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेपासून फारकत घेत राजू शेट्टींनी २००४ मध्ये जेव्हा स्वाभिमानीचा पाया रोवला, तेव्हा त्यांच्या साथीला असणाऱ्या त्यांच्या सवंगड्यांनीही राजू शेट्टींइतकीच मोलाची भूमिका बजावलेली आहे. यामध्ये सावकार मादनाईक, उल्हास पाटील, भगवान काटे, सदाभाऊ खोत, शिवाजी माने, तसेच दुसऱ्या फळीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

राज्यात स्वाभिमानीचा उदय झाला आणि राजू शेट्टी नावाचं शेतकरी नेतृत्व खऱ्या अर्थाने ऊसपट्ट्यातील लोकांना समजले. साखर कारखानदारांविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली वरील नेत्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे अल्पावाधीतच स्वाभिमानीचा धसका साखर कारखानदारांबरोबर राज्यातील प्रमुख पक्षांनीही घेतला. यातून एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना जशी एक शेतकऱ्यांची हक्काची संघटना म्हणून राज्यात वाढली, त्यापेक्षा अधिक वेगाने राजू शेट्टी हे शेतकरी नेतृत्व म्हणून उदयास आल्याचे पहायला मिळाले. आणि इथेच खऱ्या अर्थाने संघटनेत एकाधिकारशाही निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढाई लढणारी संघटना, आपला प्रतिनिधी विधानसभेत असावा याउद्देशाने कामाला लागली आणि एक नोट एक वोटच्या माध्यमातून लोकांच्या देणगीतून राजू शेट्टींना विधानसभेत पाठवण्यात संघटना यशस्वी झाली. यामुळे पक्षातील बरोबरीच्या नेत्यांनांही आमदारकीची स्वप्ने पडू लागली. संघटना जो उमेदवार देईल तो विजयी होईल अशी संघटनेची ताकद निर्माण झालेली असताना नेमकी याचवेळी राजू शेट्टीं यांनी आपला शब्द म्हणजेच अंतिम ही भूमिका घ्यायला सुरवात केली आणि खऱ्या अर्थाने संघटनेला ग्रहण लागायला सुरवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवायला जे काही मोजके सवंगडी रात्रीचा दिवस एक करत होते तेच हळूहळू संघटना कशी उध्दवस्त होईल याचे आडाखे बांधू लागले, आणि वेळप्रसंगी विरोधकांना हाताशी धरत ते यात यशस्वी देखील झाले.

उल्हास पाटलांच्या रूपाने राजू शेट्टींचा पहिला संवंगडी बाहेर पडला आणि संघटनेच्या वाताहातीला सुरवात झाली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सदाभाऊ खोतांनीही बंडाचा निशाण फडकवला आणि तेही बाहेर पडले. याठिकाणी सदाभाऊंच्या बाबतीत विचार केल्यास त्यांना संघटनेकडून मंत्रीपद देऊनसुध्दा त्यांनी स्वाभिमानीतून बाहेर पडणे पसंद केले. त्यांच्याबरोबरच इतर अनेक दुसऱ्याफळीतील नेतेही स्वाभिमानीची साथ सोडू लागले. आणि याला एकमेव कारण होते संघटनेतील विसंवाद, आपआपसातील समन्वय, सर्वानी मिळून निर्णय घेण्याची प्रक्रिया, हे सगळंच इथं थांबल्याने हे घडू लागले.

स्वाभिमानीतील सच्चा कार्यकर्त्यांचा विचार केल्यास त्यांना स्वाभिमानी ही शेतकरी संघटना म्हणूनच टिकावी अशी त्यांची अपेक्षा आहे. तर सत्तेसाठी हपापलेल्यांना स्वाभिमानी हा पक्ष म्हणून इतरांशी साटंलोट करण्यासाठी हवा आहे. विविध राजकीय प्रवाहांबरोबर जाताना सुरवातीपासूनच संघटनेतील अनेकांचा विरोध होता. परंतु साहेब म्हणतील ते अंतिम असे म्हणत काळ ढकलणारे संवंगडी यासगळ्या प्रकाराला अखेर कंटाळले आणि त्यांनी सवतासुभा मांडायला सुरवात केली.

राजू शेट्टींनी राजकीय साटेलोट्याचे आत्तापर्यंत केलेले सर्वच प्रयोग फसल्याचे इथवरच्या वाटचालीतून दिसून आले आहे. मग ते स्थानिक, प्रादेशिक अथवा राष्ट्रीय पातळीवरचे असोत सगळीकडे संघटनेच्या उमेदवारांना सपाटून हार पत्करावी लागली आहे. खुद्द राजू शेट्टींनाही याचा फटका बसला असून त्यांची दोन टर्मची खासदारकीही त्यांना टिकवता आली नाही.

मागील विधानसभेच्या निवडणूकीवेळी देखील राजू शेट्टींच्या निर्णयाने दुखावलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षांबरोबर जाण्यास विरोध दर्शवला होता. परंतु इथे देखील कुणालाही विश्वासात न घेता राजू शेट्टींनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे जुने सवंगडी उघडरित्या बोलून दाखवत आहेत. राष्ट्रवादीने तेव्हा दिलेला शब्द पाळायच्या उद्देशाने आता देऊ केलेली आमदारकीही कुणालाही विश्वासात न घेता राजू शेट्टींनी स्वीकारल्याची तक्रारही हे सवंगडी करत आहेत. आणि शेट्टींची ही जुनीच सवय असून आमच्या सहनशिलतेचा अंत झाल्याचे बोलून दाखवत आहेत.

या सगळ्यामुळे हताश झालेल्या राजू शेट्टींनी वेळप्रसंगी संघटनेसाठी स्वतःचा बळी देऊ अशी भूमिका घेतली असली तरी स्वतःचा बळी देण्याऐवजी संघटनेसाठी रात्रंदिवस झटलेल्यांना विश्वासात घेतले असते तर ही वेळच आली नसती असे मत यानिमित्ताने हे सवंगडी व्यक्त करत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी आणि विधानपरिषदेची आमदारकी या प्रकरणात खपली जरी नव्याने निघाली असली तरी जखम मात्र जूनीच आहे असेच म्हणावे लागेल. ही सर्व दुखणी जरी खरी असली तरी आजही राज्यातील लाखो शेतकरी वर्गासाठी राजू शेट्टी हे एक लढवय्या शेतकरी नेताच आहेत.

या सर्वांचा विचार करता स्वाभिमानीतील सवंगड्यांच्या मताप्रमाणे, ही वेळ राजू शेट्टींनी बलिदान देण्याची नाही तर आत्मचिंतन करून  यापुढे सर्वांना विश्वासात घेत निर्णय घेण्याची आहे.

This post was last modified on June 18, 2020 8:46 PM

Rajendra Hankare

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020