सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची ‘ही’ नवी अट माहित आहे का?

चेन्नई | तामिळनाडू सरकारने सरकारी नोकरीसाठी आता एक नवी अट ठेवली आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक परिक्षार्थ्याला आता तमीळ भाषेचा पेपर देणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी यासंदर्भातला आदेश काढला आहे. ह्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परिक्षार्थ्याचे इतर पेपर तपासले जाणार नाही, असं या आदेशात म्हटलं आहे.

सरकारी आदेशात, मानव संसाधन व्यवस्थापन सचिव, मिथिली के राजेंद्रन यांनी सांगितले की, TNPSC अंतर्गत सर्व भरती परीक्षांसाठी तमीळ अनिवार्य आहे आणि पात्रता निकष गाठण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता १०वी च्या परीक्षेत किमान ४० गुण मिळवले पाहिजेत.

आदेशात पुढे म्हटले आहे की, TNPSC गट I, II आणि IIA पदांसाठी मुख्य लेखी परीक्षेसह तमीळ परीक्षा घेतली जाईल. अनुवाद, समज आणि लेखन या निकषांमध्ये उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी तमीळ पेपर देखील अशा प्रकारे तयार केला जाईल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना १०० पैकी ४० गुण मिळवणं गरजेचं आहे.