Categories: Featured कृषी

चुकीच्या बातमीमुळे टोमॅटो पीक धोक्यात, सत्य वेगळेच!

मुंबईसोशल मिडीयावरील अफवा आणि माध्यमांमधील चुकीच्या बातम्यांचा यापूर्वी पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला. तीच गोष्ट आता टॉमेटो पिकाबाबतीत घडली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट बातमी आणि सोशल मिडिया वरील अफवा यामुळे  आता टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॉमेटो पिकामध्ये विषाणूजन्य रोग आल्याच्या तक्रारी आणि फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर मेनस्ट्रीम माध्यमांनी देखील याची पुरेशी शहनिशा न करता चुकीच्या बातम्या केल्या. त्याचा थेट परीणाम आता शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. ‘टॉमेटोलाही विषाणूची लागण’ अशी बातमी माध्यमांनी दिली. त्यामुळे अनेकांचा असा गैरसमज झाला की, आता टॉमेटोला कोरोना विषाणूची लागण झाली असून टॉमेटोला कोविड १९ आजार झालेला आहे. त्यामुळे मागील ३ दिवसांत टॉमेटोची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता सरकारने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वास्तविक टोमॉटोमध्ये नवीन एका रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने राज्यातील टोमॉटो उत्पादक शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे.  या रोगामुळे हजारो एकरवरील टोमॉटोची शेती खराब झाल्याचे सांगितले जात आहे. या रोगाचे नाव तिरंगा व्हायरस असून या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा व्हायरसची लागण झाल्यानंतर टोमॉटोचा रंग आणि आकारमध्ये बदल होत आहेत. हा व्हायरस किंवा या रोगाला शेतकरी तिरंगा म्हणत आहेत. पिकांवर हा रोग आल्यानंतर टोमॉटोला डाग पडत आहे, त्यानंतर टोमॉटो आतून काळा पडून सडत आहे. टोमॉटोवर पिवळ्या रंगाचे पट्टे देखील पडत आहेत. यामुळे टोमॉटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

बाजारात ग्राहक नाहीत. कोरोना व्हायरस आणि आता पिकांवरील या रोगांमुळे आमची चिंता वाढल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. टोमॉटोवर तीन रंग येत आहेत. यामुळे उत्पादन खराब होत असून तीन रंगामुळे तिरंगा व्हायरस असे म्हणटले जात आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: tomato