Categories: Featured कृषी

आता ऑनलाईन सोडतीवर मिळेल ट्रॅक्टर; याठिकाणी करावा लागेल अर्ज..!

मुंबई | राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेचे संपुर्ण कामकाज यापुढे ऑनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा अवजारे अनुदानासाठी म्हाडाप्रमाणे लॉटरी पध्दतीचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे कृषि यांत्रिकीकरण योजनेतील वाढती वशिलेबाजी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप यालाही चाप बसणार आहे. 

कृषि यांत्रिकीकरण अनुदान योजना १ जुलैपासून महाडीबीटीत आणली गेली आहे. तथापि, शेतकरी सध्या फक्त ऑनलाईन अर्ज करु शकतात. या अर्जावरील प्रशासकीय कामकाज मात्र ऑनलाईन केले जात नाही. कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव प्रकाश आंडगे यांनी या प्रणालीचे काम पूर्ण केले आहे.  कृषी यांत्रिकीकरण योजनेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. 

  • महाडीबीटीच्या माध्यमातून नवीन अर्जदार नोंदणीसाठी या ठिकाणी क्लिक करा
  • शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेची नवी नियमावली लवकरच जाहीर होणार आहे. उद्दिष्ट वाटप व सोडत ही दोन्ही कामे आता ऑनलाईन होणार असल्याने वशिलेबाजीला आळा बसेल व शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून छोटी अवजारे खरेदीला प्रात्सोहन मिळेल असे सांगण्यात येत आहे. पोर्टलवरच शेतकरी अर्ज भरुन बिले अपलोड करतील. मोका तपासणी, बिले मंजुरीची कामे पोर्टलवरच होतील. शेतकऱ्याने अवजार खरेदीचे बिल अपलोड करताच तीस दिवसात त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल. यंदाच्या वर्षात या योजनेसाठी ६२ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. ऑनलाईन प्रक्रियेत शेतकऱ्यांसाठी आधार नंबर सक्तीचा केल्याने बोगसगिरीलाही आळा बसणार आहे. केंद्राच्या यादीतील सर्व छोटीमोठी अवजारे यंदा योजनेत आणली गेली आहेत. यामध्ये विळ्या, खुरप्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंतच्या अनुदासाठी तीन प्रकारच्या सोडती काढल्या जाणार असल्याची माहिती आहे. दिवाळीच्या आसपास या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, सार्वजिनक सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज भरता येतील. अर्ज दाखल केल्यापासून ते अनुदान मिळेपर्यंत सर्व प्रक्रियेचे एसएमएस शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठविले जाणार आहेत. त्यामुळे मध्यस्थी तसेच शासकीय कार्यालयांमधून होणारी वशिलेबाजी थांबेल. जर एखाद्या शेतकर्‍यास शेती औजारांच्या अनुदानासाठी अर्ज करायचा असेल तर ते सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) वर जाऊन https://register.csc.gov.in/  वरून अर्ज करू शकतात. येथे शेतकरी सीएससी ऑपरेटरला आपल्या पसंतीचे अवजार सांगू शकेल. यानंतर, सीएससी सेंटर ऑपरेटर शेतकऱ्याला अर्ज क्रमांक देईल. याचबरोबर शेतकरी सायबर कॅफे इत्यादीमध्ये जाऊन देखील अर्ज करू शकतात. त्यासाठी शेतकऱ्याला https://agrimachinery.nic.in या पोर्टलवर भेट द्यावी लागेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: advanced farming prosperous Agriculture Mechanization Scheme under Shetkari Abhiyan Agriculture Department Scheme 2019 Agriculture Mechanization Scheme 2020 Avjar Bank E-Agriculture Machine Grant Portal E-Agriculture Machinery Grant 2020 Government of Maharashtra Agriculture Scheme 2019 government scheme smam application form smam guidelines 2018-19 smam guidelines 2019-20 smam scheme 2019 sub mission on agricultural mechanization sub mission on agricultural mechanization 2019 sub mission on agricultural mechanization gktoday sub mission on agricultural mechanization pib Tractor Grant Maharashtra अवजार बॅंक ई कृषि यंत्र अनुदान 2020 ई-कृषि यंत्र अनुदान पोर्टल उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 कृषी विभाग योजना 2019 कृषी विभागाच्या योजना 2019 ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी योजना 2019 सरकारी योजना