Categories: प्रशासकीय

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवे पोलिस अधिक्षक; वाचा कुणाची बदली कुठे..!

मुंबई |  राज्यातील महत्वाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता गणेशउत्सवाचा कालवधी संपताच राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत.  अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज रात्री उशिरा हे बदली आदेश काढण्यात आलेत. याबरोबरच २२ पोलिस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी अभिनव देशमुख तर कोल्हापूरच्या पोलिस अधिक्षक पदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहा  कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली…

 

Team Lokshahi News