Categories: गुन्हे

शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी अपघात; बंधाऱ्याच्या पाण्यात तरूण गेला वाहून

कोल्हापूर | शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातानंतर बंधाऱ्यात पडून एक तरूण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे. हा तरूण चंबुखडी येथील गोपाळ वसाहत येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार बाबूराव जाधव (वय ४०) हा तरूण नेहमीप्रमाणे मासे पकडायला गेला होता. मासे पकडून झाल्यानंतर घरी परतत असताना सकाळी झालेल्या रिमझिमपावसामुळे त्याची दुचाकी घसरली आणि तो पाण्यात पडून वाहून गेला. सध्या अग्निशमन दलाकडून शोधमोहिम सुरू असून तरूणाचा शोध लागलेला नाही.

Team Lokshahi News