Categories: अर्थ/उद्योग तंत्रज्ञान

काय सांगता..? अवघ्या ७ रूपयात १०० किलोमिटर नेणारी भन्नाट बाईक बाजारात दाखल; जाणून घ्या ‘या’ बाईकची खास वैशिष्टये!

नवी दिल्ली | तरुणाईला भूरळ घालणारी भन्नाट ई-बाईक हैदराबादच्या ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बाजारात आणली आहे. पाहताक्षणीच प्रेमात पाडणाऱ्या या बाईकचे नाव ऑटम वन (Atum 1.0) आहे. या नवीन बाईकची किंमत अवघी ५० हजार रुपये आहे. हटके डिझाईन, वेग, गुणवत्ता आणि स्वस्त किंमतीमुळे ही बाईक ई-मोबोलिटीचा चेहरामोहराच बदलून टाकेल असा विश्वास निर्मात्या कंपनीने व्यक्त केला आहे. भारतातील वाहनविक्रीच्या सर्व ऑनलाईन पोर्टलवर ही ई बाईक विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ऑटमवनची खास वैशिष्ट्ये – 

  • ऑटम वन बाईकमध्ये सहज बदलता येणारी लिथियम आयन बॅटरी. बॅटरी अवघ्या चार तासात चार्ज होते.
  • एकदा चार्ज केल्यानंतर किमान १०० किलोमीटरचे अंतर पूर्ण करते. बॅटरीसाठी दोन वर्षाची वॉरंटी.
  • ही बाईक मोठी मुले, तरुण आणि वयस्कर यांच्यासाठी योग्य पर्याय आहे.
  • बाईक विविध रंगात उपलब्ध.
  • ही इको- फ्रेंडली बाईक असून तिला लागणारी कमी जागा, वापरण्यात सहजता आणि उच्च कामगिरी यात उच्चस्थानी आहे.
  • बाईकच्या डिझाईनची अत्यंत खडतर आणि विविध आव्हानात्मक वातावरणात चाचणी घेण्यात आलेली आहे.
  • बाईकला रेसरचा फिल आलेला आहे.
  • बाईकचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे तिची उभारणी अस्सल भारतीय बनावटीच्या सुट्या भागांपासून करण्यात आली आहे.
  • ऑटम वन बाईकला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजीने लो-स्पीड बाईकचा दर्जा बहाल केला आहे.
  • ऑटम वनला नोंदणीची गरज नसून ती चालविणाऱ्या व्यक्तीला वाहन परवान्याचीही गरज नाही.
  • १०० किलोमीटरसाठी प्रतिदिन अवघा ७ ते १० रुपये चार्जिंगचा खर्च लागतो.

कंपनीचा बाईक उत्पादनाचा प्रकल्प तेलंगणा राज्यात असून दरवर्षी १५ हजार गाड्यांची उत्पादनक्षमता आहे. मागणीनुसार आणखी १० हजार गाड्यांनी उत्पादन वाढविण्याचीही क्षमता या प्रकल्पात आहे. ही बाईक चालविणाऱ्या व्यक्तीला वाहन परवान्याचीही गरज नाही. अगदी लहान मुलेही त्यांच्या स्थानिक भागात प्रवासासाठी ही बाईक वापरु शकतात.  ऑटम वनची बॅटरी वजनाने अतिशय हलकी असून तिचे वजन अवघे ६ किलो आहे. त्यामुळे सहज वाहून नेता येणाऱ्या तिच्या डिझाईनमुळे ती नेहमीचे थ्री पिनचे सॉकेट वापरुन कोठेही चार्ज करता येते. ती वापरण्यास अतिशय बचतपुरक असून एका चार्जिंगसाठी अवघ्या एक युनिटची वीज पुरेशी आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: e bike