पुणे।शिवसेना नावातला ‘शिव’ काढा आणि ठाकरेसेना करा, मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्या सोबत राहतात, असं खुलं आव्हान माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पुणे येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
शिवसेना या नावाला आम्ही कधी हरकत घेतली नाही, पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असं चॅलेंजच उदयनराजे यांनी शिवसेनेला दिलं. काय प्रॉब्लेम आहे, सरकार तर तुमचं आहे. मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्या सोबत राहतात, असं खुलं आवाहन यावेळी उदयनराजे यांनी शिवसेनेला केलं. दादरमधील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला.
उदयनराजेंनी या पत्रकारपरिषदेत शिवसनेवर जोरदार हल्ला चढवत, शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असे खडे बोल सुनावले.