Categories: राजकीय

उदयनराजेंच्या कार्यकर्त्याचे रक्ताने पत्र, पत्राव्दारे केलीय ‘ही’ खास मागणी

सातारा। उदयनराजे भोसले यांना मानणारे कार्यकर्त्ये त्यांच्यावरील प्रेमापोटी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. काहीसा असाच प्रकार उदयनराजेंच्या एका कार्यकर्त्याने केला असून त्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्याने उदयनराजेंना राज्यसभेवर मंत्रीपद देण्याची मागणी केलीय.

निलेश जाधव असे या चाहत्याचे नाव आहे. या तरुणाने गृहमंत्री अमित शाह यांनाच हे पत्र लिहले असून उदयनराजेंना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसादिवशीच या पट्ट्याने (१० फेब्रुवारी) हे रक्तरंजित पत्र लिहून उदयनराजेंप्रती आपल्या भावना व्यक्त केल्यात. या पत्रात निलेशने म्हणटयं की,  

  • मी निलेश सुर्यकांत जाधव सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रीपद मिळावे आणि छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो.” आपला, निलेश जाधव

सध्या निलेशचे हे पत्र सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील संसद भवनात अमित शाहांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांच्या भेटीत महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली होती. त्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर शाह आणि फडणवीस यांची सहमती दर्शवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: amit shah follower letter Satara udayanraje Udayanraje Bhosale udayanraje bhosale follower letter to amit shah