मुंबई।“रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लिहिली आहे. रोहित पवार यांनी महाभरतीची प्रक्रिया महापोर्टलऐवजी ऑफलाईन पद्धतीने घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून, त्याबाबतची माहिती दिली आहे.
लवकरच महारभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीनेच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा रोहित पवारांनी या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. तसंच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो, असंही रोहित पवारांनी म्हटलं. रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी खाली दिली आहे.