Categories: शिक्षण/करिअर

यूपीएससी २०१९ : प्रदीप सिंह देशात अव्वल तर प्रतिभा वर्मा मुलींमध्ये पहिली – ‘येथे’ पहा संपूर्ण निकाल

नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०१९ चे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये प्रदीप सिंह देशात अव्वल आला असून जतीन किशोर देशात दुसरा आला आहे. महिला उमेदवारांमध्ये प्रथम आलेली प्रतिभा वर्मा देशात तिसरी आली आहे. यूपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला आहे. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यूपीएससी दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस- IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस – IFS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस- IPS)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते.

संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

२०१९ मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत ७८ उमेदवारांची निवड झाली आहे. तर ११ उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील यशस्वी –
नेहा भोसले – देशात १५ वी
मंदार पत्की (बीड) – देशात २२ वा, राज्यात दुसरा
योगेश अशोकराव पाटील – देशात ६३ वा
राहुल लक्ष्मण चव्हाण – देशात १०९

#UPSC result declared 2020 pic.twitter.com/3lotPQiVJd

— Piyush ratan (@Piyush91733030) August 4, 2020

Final List #UPSC
Many Congratulations To All Sucess Candidate 

pic.twitter.com/uVwq7ZNuQ7

— Balaji Ankit Pathak (@Balaji_Ankit) August 4, 2020

नागरी सेवा परीक्षा 2020 या 31 मे रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: upsc result upsc result 2018 upsc result 2019 list state wise upsc result 2019 name list upsc result 2019 topper list upsc result 2020 upsc result mains 2019 upsc result today upsc निकाल upsc निकाल २०१ name चे नाव यादी upsc निकाल २०१ state यादी राज्य निहाय upsc निकाल २०१ to अव्वल यादी upsc निकाल 2018 upsc निकाल २०२० upsc निकाल आज upsc निकालाचा निकाल 2019