Categories: महिला सामाजिक

वैदेही पाध्ये यांची कृषि पदवीधर संघटनेच्या युवती सचिव पदी निवड

कोल्हापूर | कृषि पदवीधर संघटनेच्या युवती सचिव पदी गगनबावडा तालुक्यातील वैदेही श्रीकृष्ण पाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस पाटील, यांनी नुकतेच दिले आहे. कृषि पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील कृषि व संलग्न पदवीधर बांधवांची सर्वोच्च संघटना आहे. जिल्हाध्यक्ष वीर पाटील यांचे शिफारशीने सर्वानुमते या संघटनेच्या युवती सचिव कोल्हापूर जिल्हा पदी ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात म्हणटले आहे.

वैदेही पाध्ये या सध्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या गगनबावडा, पन्हाळा, शाहुवाडी तालुका प्रमुख म्हणून काम पाहतात.  ग्राहक चळवळ, ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच महिलांचे प्रबोधन करण्याचे काम करतात. तसेच त्या ग्रामीण भागातील महिलांचे संघटन बांधणीचे कामही करत असून तालुक्यातील विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. 

  • कृषि पदवीधर संघटनेचे कार्य –
    • महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी,पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील
    • सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संघटना.
    • महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत.
    • विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म
    • कृषि पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात.
    • संस्थेच्या सदस्यांना, पदवीधर बांधवांना निर्माण होणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे. शासन दरबारी ते मांडणे कृषि व पूरक क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवणे
    • या बरोबरच शेतकरी बांधवाना कृषि व समस्त पदवीधरांच्या माध्यमातून कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे, उद्योजकतेचा विकास करणे, तसेच शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात कृषि पदवीधर बांधवांच्या माध्यमातून सहभाग घेणे आणि एकूणच कृषि क्षेत्रात नवनवीन कृषि व पर्यावरण विषयक पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे हि विचारधारा संस्थे द्वारे कार्यरत आहे.
Team Lokshahi News