मुंबई | विधानपरिषदेचे निकाल हाती येत असून यामध्ये राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी, भाजपचे प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात चुरस सुरू होती. मात्र आश्चर्यकारक पणे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झालेत.

8:30 Pm Update : पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली असून, यापूर्वी घडलेल्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचं मत बाद करण्यात आलं आहे, तर भाजपच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता २८३ आमदारांची मत मोजली जाणार आहे. त्यामुळे काही वेळातच निकाल हाती येणार.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून यातून कोण हरणार याचा फैसला लवकरच लागणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या कोट्यातील एक एक मत बाद झाल्याने आता महाविकास आघाडीचे भाई जगताप की भाजपचे प्रसाद लाड विजयी होणार हे पहावं लागणार आहे.

यासर्व घडामोडीत दोन मत बाद झाल्याने याचा फायदा कॉंग्रेसच्या भाई जगताप यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.