Categories: Featured

भिडे गुरूजींसाठी सोशल मिडीयावर व्हायरल होतोय ‘हा’ संदेश…

संजय राऊत बडबडले आणि किडे भुरुजींच्या धोतरात चुळबुळ झाली. शिवरायांविषयी भाजपाने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर दोन दिवस मुग गिळून बसलेले भुरजी आज शिवसेनेविरोधात बत्तीशी पाजळून बाहेर पडले. सांगलीत उद्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित असताना सांगली बंद करु अशी शिखंडीप्रतिज्ञा भुरुजींनी केली.

नेहमी शिवसैनिकांना हवेहवेसे वाटणारे भुरुजी शिवसेना की मातृसंस्था यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा बरोब्बर मुळाकडेच धावले. तसे ते भाजपाचा मुख्यमंत्री बनत नाहीय असे दिसल्यावर मांडवली बादशहा बनून मातोश्रीच्या पायर्‍या झिजवायलाही गेले होतेच (आता तिथून हाकलून दिले हा भाग अलहिदा). परंतु संघ-भाजपासाठी जेवढे काळीज कळवळते तेवढे कधी शिवसेनेसाठी कळवळले होते का हो भुरुजी ?

दगड मारायला शिवसैनिक आणि सत्ता उबवायला संघोटे हे गणित यापुढे चालणार नाही हे जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल तेवढंच चांगलंय. स्वत़ःला तुम्ही अराजकिय संघटन म्हणवता तर दोन पक्षाच्या राजकिय जुगलबंदीत तुम्हाला आपल्या धोतराचा सोगा का अडकवायचाय बरं? तुमचे पॉलिटिकल ईंटरेस्ट्स काय? तुमचा बोलावता धनी कोण? माजी खासदार उदयन भोसले हे एका राजकिय पक्षाचे नेते आहेत. राजकिय टिकाटिपण्या या त्यांना सोसाव्याच लागतिल. ते झेपत नसेल तर त्यांनी राजकारण सोडून संन्यास घ्यावा. 

बाकी, आज छत्रपती वंशजांचा तुम्हाला आलेला पुळका हा मातृसंस्थेसाठीचा कळवळा आहे हे समजण्याईतके ना शिवसैनिक मुर्ख राहिलेत ना महाराष्ट्र !

Lokshahi News