Categories: Featured कृषी

सौर कृषीपंप योजना हवी आहे? मग हे वाचा!

मुंबई | शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपारिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात एक लाख सौर कृषी पंपांची योजना १५ नोव्हेंबर २०१८ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा दुसरा व तिसरा टप्पा राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑगस्ट २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषी पंप उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली होती. २५ हजार कृषी पंपांना पारंपरिक पद्धतीने उच्च दाब वितरण प्रणाली जोडणी दिल्यास ६२५ कोटी रुपये तर या तुलनेत सौर ऊर्जेवर उभारणीसाठी ४५४ कोटी ७२ लाखांचा खर्च येतो. यामुळे १७० कोटी २८ लाखांची बचत होते. सौर कृषी पंपांमुळे दिवसा सिंचन शक्य तर होतेच पण त्याचबरोबर नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या स्त्रोतावर आधारित असल्याने पर्यावरणाची हानी देखील होत नाही

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

 1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
  • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
 2. ए – 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
  • 7/12 उतारा प्रत
  • आधार कार्ड
  • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
 3. अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
 4. ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
 5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
 6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
लाभार्थींसाठी मार्गदर्शक सुचना
 1. या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील.
  • पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
  • 31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
  • 01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
  • 2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.
 2. लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
  • 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
  • राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
  • विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
  • अतिदुर्गम भागातील शेतकरी.
  • महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
  • सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
  • अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.
सौर कृषीपंपाचे फायदे
 • दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
 • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
 • वीज बिलापासून मुक्तता
 • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
 • पर्यावरण पुरक परिचलन
 • शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
 • औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे
योजनेची ठळक वैशिष्टे
 • पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
 • सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Application Mahavitaran Atal Solar Krishi Pump Yojana Maharashtra Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana Mukhyamantri Solar Pump Yojana Pradhan Mantri Solar Pump Yojana Solar Energy Krishi Pump Solar Energy Online Form Solar Pump Scheme Maharashtra 2019 अटल सोलर कृषि पंप योजना महाराष्ट्र अर्ज महावितरण प्रधानमंत्री सोलर पंप योजना मुख्यमंत्री सोलर पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सोलर पंप योजना महाराष्ट्र 2019 सौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म सौर ऊर्जा कृषि पम्प