भारतीय वायुसेनेत Class1 ऑफिसर व्हायचयं? मग ‘या’ परीक्षेची करा तयारी

मुंबई | काही तरुणांना भारतीय वायू सेनेत (Indian Army jobs) दाखल होण्याची इच्छा असते. यासाठी NDA सारख्या मोठ्या परीक्षांची तयारी अनेक जण करतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा (How to crack Government Exams) देणं महत्त्वाचं असतं आणि यासाठी अभ्यास देखील खूप करावा लागतो. जर तुम्हालाही भारतीय वायुसेनेत Class1 Officer (Class 1 Officer Jobs in IAF) म्हणून नोकरी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी परीक्षा सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही वायू सेनेतील ही नोकरी मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया या परिक्षेबद्दल..

वायू सेनेत क्लास वन अधिकारी पदाची नोकरी मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या या परिक्षेचं नाव AFCAT (Air Force Common Admission Test) असं (What is AFCAT Exam?) आहे. ही परीक्षा देऊन तुम्ही भारतीय वायुसेनेत (Indian Air Force Jobs) Class1 Officer होऊ शकता. या परीक्षेसाठीची पात्रता काय? ही परीक्षा नेमकी (How to give AFCAT Exams) कशी असते? कोणते उमेदवार (Eligibility for AFCAT Exam) ही परीक्षा देऊ शकतात? या तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणू घेऊया..

AFCAT म्हणजे नक्की काय?
भारतीय वायुसेनेद्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा हवाई दलातील वर्ग-I अधिकारी (फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी) उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाते. ही परीक्षा साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये घेण्यात येते. या परीक्षेत उमेदवारांना उड्डाण शाखा, तांत्रिक शाखा आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी नियुक्त केले जाते. या परीक्षेत, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते, ज्यामध्ये शॉर्ट कमिशन आणि कायम कमिशनचा समावेश आहे जो पुरुष आणि महिला दोघांसाठी असतो.

फ्लाइंग ब्रांच पात्रता
अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे.

टेक्निकल ब्रांच पात्रता
अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे.

असा असतो AFCAT परीक्षेचा पॅटर्न (Exam pattern for AFCAT Exam)
या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतात. जे सोडवण्यासाठी उमेदवारांना 2 तासांचा अवधी देण्यात येतो. हा पेपर 300 गुणांचा आहे, म्हणजे जर तुम्ही 1 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला 3 गुण मिळतील. या परीक्षेत 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील असते, त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याची विशेष काळजी घ्या आणि एलिमिनेशन पद्धत वापरा ज्याद्वारे तुम्ही योग्य उत्तर शोधू शकाल.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)