नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे बंद झालेत. अनेकांना आपल्या नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले आहे. पण याच काळात शेती व्यवसायाने मात्र अनेकांना मदतीचा हात दिला आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योग व्यवसायांचे अर्थचक्र ठप्प झालेले असताना शेती संबंधित व्यवसाय आणि इतर कामांना शासनाने मोकळीक दिली होती. यादरम्यान ट्रॅक्टरच्या विक्री व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. मागील चार वर्षाच्या काळातील मरगळ या दरम्यान दूर झाल्याचे पहायला मिळत आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी ग्राहकांना कराव्या लागणाऱ्या वेटिंगवरून हे स्पष्ट होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तर वर्षभराचे विक्रीचे टारगेट १ ते २ महिन्यात पूर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान या काळात ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी खासगी बँक एचडीएफसीने एक ऑफर जबरदस्त आणली आहे. या ऑफरच्या अंतर्गत अर्ध-शहरी, ग्रामीण भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्जावर मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर ९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या कॉमन सर्विस सेंटर नेटवर्कशी करार करत एचडीएफसी बँकेने दरवर्षीप्रमाणे ‘फेस्टिव्हल ब्लास्ट ऑफर’ सुरू केलेली आहे. जेणेकरून बँकेला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवेश मिळेल आणि ग्रामीण भागातील लोकही याचा मोठा लाभ घेऊ शकतील. ही ऑफर अर्ध-शहरी भागासाठी देखील आहे. ट्रॅक्टर कर्ज, कार कर्ज, मोटारसायकल कर्ज यावर एचडीएफसी बँकेने विशेष सूट दिली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील १.२ लाख नोंदणीकृत व्यावसायिकांनादेखील ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच बँकेशी संबंधित ३००० हून अधिक स्थानिक व्यावसायिकही बँकेच्या वतीने ही सुविधा पुरवतील. या अंतर्गत ५ ते १५% पर्यंत सूट देण्यात येईल.
खालील लिंकवर योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या – https://v1.hdfcbank.com/htdocs/common/2020/sept/festivetreat/tractor_loan.html?
कसा घ्याल लाभ?
पात्रता –