Categories: Featured अर्थ/उद्योग

आधार सेंटरची फ्रॅंचायझी घ्या आणि करा चांगली आर्थिक कमाई; असा करा अर्ज!

नवी दिल्ली | जर तुम्ही सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रॅंचाईझी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रॅंचाईझी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल.

लायसन्स घेण्यासाठी UIDAI कडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल.

आधार कार्ड सेंटरची कामं :
– नवीन आधार कार्ड तयार करणे
– आधार कार्डमधील स्पेलिंग, नावात बदल करणे
– पत्ता, जन्म तारीख चुकीची असल्यास ती दुरुस्त करणे
– फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करणे

आधार कार्ड सेंटर सुरु करण्यासाठी, लायसन्स मिळवण्यासाठी, ऑनलाईल अप्लाय करावं लागेल. त्यानंतर परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत पास झालेल्यांना आधार कार्डचं लायसन्स मिळतं. लायसन्स मिळवण्यासाठी काय आहे प्रक्रिया –

– सर्वप्रथम  NSEIT (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) वेबसाईटवर क्लिक करा.
– त्यानंतर Create New User वर क्लिक करावं लागेल.
– त्यानंतर एक XML File तयार होईल.
– Share Code enter करण्यासाठी सांगितलं जाईल.
– XML File आणि Share Code साठी आधारची वेबसाईट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपलं offline e aadhar डाऊनलोड करावं लागेल.
– येथून डाऊनलोड केल्यानंतर XML File आणि share code दोन्ही डाऊनलोड होतील. 
– त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, त्यात काही खासगी माहिती भरावी लागेल.
– हा फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर, यूजर आयडी आणि पासवर्ड येईल. 
– त्यानंतर Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉगइन करता येईल.
– त्यानंतर Continue बटणवर क्लिक करा.
– समोर एक फॉर्म, काही माहिती भरण्यासाठी येईल.
– फॉर्म भरल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करता येईल.
– त्यानंतर प्रिव्हयूचा ऑप्शन दिसेल. या प्रिव्ह्यूमध्ये संपूर्ण माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही, ते तपासा.
– आता Declaration Boxवर क्लिक करुन Proceed to submit formवर क्लिक करा. 

संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी Siteच्या Menuवर जाऊन पेमेंट वर क्लिक करा. त्यानंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करा. खाली देण्यात आलेल्या Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. येथून चलानची पावती डाऊनलोड करुन ती प्रिंट करता येईल.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर २४ ते ३६ तासांपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतरच वेबसाईटवर लॉगइन करता येईल. त्यानंतर Book Center वर क्लिक करा. यात कोणतंही जवळचं सेंटर निवडा. या सेंटरवर आधार परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर काही दिवसांनी Admit card मिळेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Aadhar Card Adhar card bank insurance BANK link with Aadhar crop insurance family insurance government scheme uidai आधार कार्ड एड्रेस चेंज एप्लीकेशन आधार कार्ड पता परिवर्तन दस्तावेजों आधार कार्ड पत्ता बदल आधार कार्ड में एड्रेस चेंज करने के लिए आधार कार्ड में जन्मतिथि बदलने आधार कार्ड में नाम चेंज करना है आधार कार्ड में सुधार 2019 आधार कार्ड में सुधार form नाम आधार कार्ड में वर्तनी सुधार