कोल्हापूर। जिल्ह्यातील तहसिल कार्यालयात (करवीर व गगनबावडा वगळून) सेतू सुविधा केंद्रे कार्यरत असून त्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांच्या ठिकाणी (करवीर वगळून) आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांनी https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना उपलब्ध करुन घ्यावा. आणि अर्जात नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह ३१ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हीस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे.