Categories: तंत्रज्ञान मनोरंजन

..’या’ लिंकव्दारे नेटफ्लिक्सवर पाहा विनामूल्य सिरीज आणि चित्रपट

ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आता आपल्या युजर्सला अनेक ओरिजिनल सिरीज आणि चित्रपट फ्री मध्ये प्रदान करणार आहे. आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन मेंबरशीप मिळविण्यासाठी कंपनीने हा नवीन फंडा वापरला आहे. कंपनीच्या या ऑफरतंर्गत युजर्स सर्व भाषांमधील चित्रपट पाहू शकतील. मात्र नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीजच्या पहिल्या सीझनचा फक्त पहिलाच एपिसोड तुम्हाला पाहता येईल. सध्या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन प्लॅन 199 ते 799 रुपयांच्या दरम्यान आहे.

कुठे पाहाल फ्री चित्रपट

यासाठी नेटफ्लिक्सचे अकाउंट असणे आवश्यक नाही. लाभ घेण्यासाठी तुम्हाला netflix.com/watch-free लिंकवर जावे लागेल. ही ऑफर ब्राउजर आणि कॉम्प्युटरसह विंडोज पीसी, मॅक, अँड्रॉइड डिव्हायसेस, स्मार्ट टीव्ही आणि फायर स्टिकवर उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्सवरील फ्री चित्रपटांमध्ये स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव्ह इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), आवर प्लॅनेट (Our Planet) आणि ग्रीक अँड फ्रँकी (Grace and Frankie) इत्यादींचा समावेश आहे.

Team Lokshahi News