Categories: Featured

लढणार आणि जिंकणार म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रवासियांसाठी मांडले महत्वाचे मुद्दे…

मुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी लढणार आणि जिंकणार असे सांगत काही महत्वाचे मुद्दे मांडलेत.

 • दिल्लीच्या मरकज वरून परतलेल्या सर्वांना शोधलं असून जी यादी मिळाली होती त्या सर्वांना क्वारंटाईन केलं आहे.
 • मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करणाऱ्या ७ वर्षाच्या आराध्या नावाच्या चिमुकलीचे आभार मानत तिची ही समाजाप्रती आत्मियता कोरोनावर मात करण्यास समर्थ आहे.
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक इशारा, तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
 • जात, पात, धर्म न पाहता एकवटलेल्या समाजाच्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, अजिबात गय केली जाणार नाही.
 • मुंबईत चाचण्याची केंद्रे वाढवली आहेत. तपासण्या वाढल्याने रूग्णाची संख्या वाढली
 • अनेकांनी हॉटेल्स, इमारती, बंगले सेवेसाठी खुली केली आहेत, त्यांचे आभार
 • जेष्ठ कुटूंबियांची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, आणि कुणालाही बाहेर पडू देऊ नका
 • कोणत्याही स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, उत्सव केले जाऊ नयेत
 • पंढरपूरची चैत्रवारी रद्द
 • महाराष्ट्रात ५ लाख परप्रांतिय मजूरांची सोय केली
 • प्रत्येक जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा वाढवली आहे.
 • दहशतवाद्यांचं जसं लक्ष मुंबईवर असतं तसंच कोविड-१९ चं आहे. परंतु नेहमीप्रमाणे यांना आपण मात देणार हे नक्की
 • लक्षण दिसल्यास कोविड चाचणी करणाऱ्या दवाखान्यात जा
 • मास्क नसणाऱ्यांनी स्वच्छ कापड वापरून त्याचा मास्क प्रमाणे वापर करावा
 • भाजी आणायला गेलात तरी कापडाचा मास्क करून वापरा
 • गर्दी टाळा, सोशल डिस्टंसिंग पाळा
 • घरी राहून मानसिक ताण येण सहाजिक आहे, परंतु सध्याची परिस्थीती बाहेर पडण्यासारखी नाही हेही ध्यानात घ्या
Rajendra Hankare