पुणे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावासाने चांगलीच हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाने गारांसह हजेरी लावून पिकांचे नुकसान केले. आज (११ एप्रिल) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पुन्हा मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यात १६ एप्रिल पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तसेच गोव्यात देखील आज संपूर्ण राज्यात पावासाची शक्यता आहे.
सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. १३ व १४ एप्रिलला विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यात आज उद्या आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
(पुणे वेधशाळेचा १० ते १६ एप्रिलचा हवामान अंदाज पहा)