Categories: Featured हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; पहा १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरचा संपूर्ण हवामान अंदाज

पुणे | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज असून यामुळे शेतकरी वर्गाची हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मात्र नुकसान होणार आहे. 

गुजरात व मध्य प्रदेशातून मान्सूनने माघार घेतली आहे. तर येत्या काही दिवसात महाराष्ट्रातही परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचा प्रभाव काहीसा कमी झाला असून ते उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. चक्राकार वाऱ्याची अशीच स्थिती रायलसिमा आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरही निर्माण झाली आहे. 

खालील लिंक ओपन करून पहा १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर पर्यंतचा हवामानाचा अंदाज
Weather Forecast 12 Oct. to 18 Oct. 2020

सध्या राज्यात सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून काही ठिकाणी धुके देखील पडत असल्याचे दिसून येत आहे. तर दिवसभराच्या तापमानातही कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान बुधवारी (१४ ऑक्टोबर) अंदमानच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील तर बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: august weather forecast July weather forecast monsoon 2020 monsoon climate Monsoon in Maharashtra in the next 24 hours monsoon weather monsoons in india northeast monsoon nutritious kharif signs of good rains southwest-monsoon summer monsoon types of monsoon Weather forecast आजचे हवामान अंदाज 2020 live हवामान अंदाज 2020 हवामान अंदाज पुणे हवामान अंदाज मराठवाडा हवामान अंदाज महाराष्ट्र 2019 हवामान अंदाज महाराष्ट्र 2020