Categories: बातम्या हवामान

राज्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा; एका क्लिकवर पहा १९ ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज

पुणे | बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने बुधवारी (१४ सप्टेंबर) कोल्हापूर, सिंधूदूर्ग, उस्मानाबाद या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याबरोबरच राज्याच्या विविध भागात तुरळक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मागील तीन दिवसांपूर्वी बंगालच्याउपसागरात कमी दाबक्षेत्राचे चक्री वादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्रच्या किनारपट्टीवरून जमिनीवर आल्याने काही ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. वातावरणातील बदलाची ही स्थिती पुढील ३ दिवस कायम राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

हवामान अंदाज – (खालील लिंकवर क्लिक करा)
Weather Forecast 13 ऑक्टोबर to 19 ऑक्टोबर 2020 ()

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे येत्या ४ ते ५ दिवसात पावसाचा जोर कमी होईल. त्यानंतर २० ऑक्टोबरपासून राज्यातून परतीच्या मान्सूनला सुरवात होण्याची शक्यता आहे. परतीच्या मान्सूनला सुरवात झाली तरी पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

Team Lokshahi News