Categories: Featured

हवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

मुंबई | बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेच्या दाबाची स्थिती काही प्रमाणात शिथील झाली आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या सर्वत्र ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडणार असल्याच अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तवला आहे.

उत्तर भारतात असलेला मॉन्सून पट्टा मंगळवारी काही प्रमाणात सरकरणार आहे. तर बुधवारी उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. गुरुवारी या दाबाचे चक्राकार वाऱ्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू राहणार आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वार वाहणार आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाबळेश्वर येथे १५० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Lokshahi News