Categories: कृषी हवामान

महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज अवकाळी पावसाचा अंदाज

 • विदर्भात येणाऱ्या दोन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात काल(१७ मार्च) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
 • भारतीय हवामानशास्त्र  विभाग पुणे यांचेकडून प्राप्त झालेल्या अंदाजानसुार कोल्हापूर जिल्ह्यात १९ मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. २१ मार्च रोजी हवामान स्वच्छ राहील तर १८ ते २० आणि २२ मार्च रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३३.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २४ अंश सेल्सिअस राहील.

पुणे। महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून महराष्ट्राच्या विविध भागात याचा प्रत्यय आला आहे. काल (१७ मार्च) महाराष्ट्राच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले.

आज बुधवार (१८ मार्च) विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरून बाष्पपुरवठा होत आहे. यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात जोरदार वारे वाहून विजा, मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (हवामान विभागाची अधिकृत माहिती पाहण्यासाठी निळ्या अक्षरांवर क्लिक करा)

 • काढणी केलेल्या शेती मालाची योग्य आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
 • बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे.त्यामुळे जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळझाडांच्या खाली वाळलेली पाने, तूर, काड्या, वाळलेले पाचट यांचे आच्छादन करावे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या कमाल व किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

 • हवामान अंदाज खालील तारखांना…
  • १८ मार्च – विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा अंदाज, कोकण गोव्यात कोरडे हवामान
  • १९ मार्च – मराठवाडा विदर्भात पाऊस, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान
  • २० मार्च – विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान
 • इशारा –
  • १७ मार्च – विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस
  • १८ मार्च – विदर्भ, मराठवाडा तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस
  • १९ मार्च – विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: climate change crop insurance by weather basis global warming Indian weather weather Weather forecast पीक पाणी हवामान हवामान अंदाज